भारत निवडणूक आयोगाची स्थापना २५ जानेवारी १९५० रोजी झाली आहे. त्यामुळे २५ जानेवारी हा दिवस राष्ट्रीय मतदार दिवस म्हणून साजरा करण्यात येतो. त्या अनुषंगाने २५ जानेवारी रोजी जिल्हाधिकारी व जिल्हा निवडणूक अधिकारी यांच्या कार्यालय मार्फ़त विविध कार्यक्रमांचे आयोजन कवयित्री बहीणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव येथे करण्यात आले आहे. मतदार असल्याचा अभिमान मतदारास असावा. मतदारांना विशेषतः नवमतदाराना मतदान यादीत नाव नोंदविण्यासाठी प्रोत्साहित करणे हा राष्ट्रीय मतदार दिन साजरा करण्याचा मुख्य उद्देश आहे
भारतीय लोकशाही गणराज्यात प्रत्येक भारतीय नागरिकाला सार्वत्रिक तथा पोट निवडणुकीत मतदानाचा मूलभूत हक्क बहाल केलेला आहे. त्यामुळे मतदार यादीत नाव नोंदवून मतदानाचे कर्तव्य पार पाडून लोकशाही बळकट करण्याचा वाटा उचलण्याची संधी प्रत्येक भारतीय नागरिकाला आहे. या निमित्त विविध ऑनलाइन स्पर्धांचे शालेय(९ ते १२ वी ) व महाविद्यालयीन विद्यार्थ्यंसाठी आयोजन करण्यात आले आहे
तरी विद्यार्थ्यांनी खालील स्पर्धेमध्ये दिनांक १५/०१/२०२२ ते २०/०१/२०२२ या कालावधीत सहभाग घ्यावा