नोंदणी अर्ज

जाणून घेऊया राष्ट्रीय मतदार दिवसाबद्दल

भारत निवडणूक आयोगाची स्थापना २५ जानेवारी १९५० रोजी झाली आहे. त्यामुळे २५ जानेवारी हा दिवस राष्ट्रीय मतदार दिवस म्हणून साजरा करण्यात येतो. त्या अनुषंगाने २५ जानेवारी रोजी जिल्हाधिकारी व जिल्हा निवडणूक अधिकारी यांच्या कार्यालय मार्फ़त विविध कार्यक्रमांचे आयोजन कवयित्री बहीणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव येथे करण्यात आले आहे. मतदार असल्याचा अभिमान मतदारास असावा. मतदारांना विशेषतः नवमतदाराना मतदान यादीत नाव नोंदविण्यासाठी प्रोत्साहित करणे हा राष्ट्रीय मतदार दिन साजरा करण्याचा मुख्य उद्देश आहे

भारतीय लोकशाही गणराज्यात प्रत्येक भारतीय नागरिकाला सार्वत्रिक तथा पोट निवडणुकीत मतदानाचा मूलभूत हक्क बहाल केलेला आहे. त्यामुळे मतदार यादीत नाव नोंदवून मतदानाचे कर्तव्य पार पाडून लोकशाही बळकट करण्याचा वाटा उचलण्याची संधी प्रत्येक भारतीय नागरिकाला आहे. या निमित्त विविध ऑनलाइन स्पर्धांचे शालेय(९ ते १२ वी ) व महाविद्यालयीन विद्यार्थ्यंसाठी आयोजन करण्यात आले आहे

तरी विद्यार्थ्यांनी खालील स्पर्धेमध्ये दिनांक १५/०१/२०२२ ते २०/०१/२०२२ या कालावधीत सहभाग घ्यावा

अर्ज कसा करायचा?

स्पर्धाकांची नोंदणी

लॉगिन

अपलोड फाइल

निकाल

निबंध स्पर्धा

  • एकून गुण-२०
  • शब्द मर्यादा - शालेय गट ३००ते ५००
  • महाविद्यालयीन गट ५०० ते १०००
  • कागद -A 4
  • भाषा-मराठी/हिंदी/इंग्रजी
  • हस्तलिखित , सुंदर हस्ताक्षर,मुद्द्येसूद मांडणी
  • वैयक्तिक सामाजिक, व राजकीय दृष्ट्या विवादास्पद लिखाण टाळावे
  • लिखाणाची स्कॅन PDF करून अपलोड करावी

चित्रकला स्पर्धा

  • एकून गुण-२०
  • चित्रात कोणतेही कलर वापरू शकतात
  • कागद -ड्रॉइंग शीट A 4 (ड्रॉइंग शीट चा चौथा भाग)
  • स्वनिर्मित व विषयाला अनुसरून चित्र असावे
  • वैयक्तिक सामाजिक, व राजकीय दृष्ट्या विवादास्पद टिपणी टाळावी
  • ड्रॉइंग सीट स्कॅन करून JPG स्वरूपात अपलोड करावी .

पोस्टर /मीम स्पर्धा

  • एकून गुण-२०
  • डीजीटल किंवा स्वनिर्मित,विषयाला अनुसरून असावे
  • रंगीत किंवा कृष्णधवल असावे
  • कागद -ड्रॉइंग शीट A 4 (ड्रॉइंग शीट चा चौथा भाग)
  • वैयक्तिक ,सामाजिक, व राजकीय दृष्ट्या विवादास्पद कलाकृती टाळावी
  • ड्रॉइंग सीट स्कॅन करून JPG स्वरूपात अपलोड करावी .

घोषवाक्य

  • एकून गुण-२०
  • शब्द मर्यादा -१६ ते २० शब्द
  • कागद -A 4
  • भाषा-मराठी/हिंदी/इंग्रजी
  • स्वरचित समर्पक
  • वैयक्तिक,सामाजिक, व राजकीय दृष्ट्या विवादास्पद रचना टाळावी
  • लिखाणाची स्कॅन JPG करून अपलोड करावी

गाणे /कविता

  • एकून गुण-२०
  • शब्द मर्यादा - २० ओळी पेक्षा जास्त नको
  • कागद -A 4
  • भाषा-मराठी/हिंदी/इंग्रजी
  • स्वरचित अर्थपूर्ण असावे
  • वैयक्तिक,सामाजिक, व राजकीय दृष्ट्या विवादास्पद रचना टाळावी
  • लिखाणाची स्कॅन PDF करून अपलोड करावी

रांगोळी स्पर्धा

  • एकून गुण-२०
  • रंग कोणताही वापरण्यास मुभा असेल
  • ३ फूट * ३ फूट आकार असावी
  • विषयानुरूप असावी
  • वैयक्तिक सामाजिक, व राजकीय दृष्ट्या विवादास्पद रांगोळी टाळावी
  • रांगोळीचा फोटो काढून JPG अपलोड करावी

नोंदणी केलेले शाळा/कॉलेज

329
नोंदणी विद्यार्थी
94
नोंदणी शाळा/कॉलेज
166
निबंध स्पर्धा
17
मीम/पोस्टर
66
चित्रकला स्पर्धा
17
गाणे /कविता
35
रांगोळी स्पर्धा
66
घोषवाक्य

 फोटो गॅलरी